महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत पदवी उत्तीर्णांसाठी मोठी पदभरती! पगार 32000 मिळेल

ऑक्टोबर 21, 2024 5:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरी शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकमार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पदवी पास असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. आणि हो 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. MSC Bank Bharti

MSC Bank

कोणती पदे भरली जाणार?
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारीच्या 25 जागा तर प्रशिक्षणार्थी सहयोगीच्या 50 जागांसाठी ही भरती होणार आहे.
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता:
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
प्रशिक्षणार्थी सहयोगी – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

अर्ज शुल्क :
पद क्र.1: ₹1770/-
पद क्र.2: ₹1180/-
इतका पगार मिळेल:
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – ३०,०००/- ते ४९,०००/-
प्रशिक्षणार्थी सहयोगी – २५,०००/- ते ३२,०००/-

वयाची अट: 31 ऑगस्ट 2024 रोजी,21 ते32 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now