जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत विविध विभागांतील तब्बल 5,707 रिक्त पदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. महसूल, वित्त, गृह, उद्योग, मत्स्यव्यवसाय, अन्न व नागरी पुरवठा आदी विभागांमध्ये ही भरती होणार असून, पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. MPSC Group C Bharti 2026

या भरतीमध्ये तलाठी, लिपिक-टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, कर सहायक, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यासह विविध पदांचा समावेश आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे. MPSC Group C Recruitment 2026

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि रिक्त जागा :
उद्योग निरीक्षक – 9
तांत्रिक सहायक – 3
कर सहायक – 282
सहायक मोटार वाहन निरीक्षक – 461
लिपिक-टंकलेखक (मंत्रालय व विविध कार्यालये) – 1,864
ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)– 1,539
वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-क – 11
सहायक अधीक्षक, गट-क – 11
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क– 254
लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)– 944
लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभाग – 339
शैक्षणिक पात्रता
पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. बहुतांश पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे. काही पदांसाठी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा, मत्स्यविज्ञान (B.F.Sc.) पदवी तसेच मराठी किंवा इंग्रजी टंकलेखनाचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
वयोमर्यादा
1 ऑक्टोबर 2026 रोजीच्या स्थितीनुसार बहुतांश पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे किंवा 19 ते 38 वर्षे आहे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात येणार आहे.
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग: ₹394
मागासवर्गीय/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ: ₹294
माजी सैनिक: ₹44
नोकरीचे ठिकाण : निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती संपूर्ण महाराष्ट्रात विविध शासकीय विभागांमध्ये करण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये स्थिर सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती मोठी संधी असून, इच्छुकांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावरील अधिसूचना वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.












