जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही पदवीधर असाल आणि MPSC मार्फत सरकारी नोकरी मिळविण्यासाठी पर्यंत करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध केली. MPSC Group B Recruitment 2025

या भरती अंतर्गत एकूण 282 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची ही उत्तम संधी असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 1 ऑगस्टपासून अर्ज करू शकणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 निश्चित करण्यात आली आहे. MPSC Group B Bharti 2025

रिक्त पदाचे नाव :
1) सहायक कक्ष अधिकारी,गट ब 03
2) राज्य कर निरीक्षक,गट ब 279
शैक्षणिक पात्रता: पदवीधर
वयाची अट अन् परीक्षा शुल्क :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट दिली जाईल. परीक्षा शुल्काबाबत बोलायचं झालं तर खुला प्रवर्गातील उमेदवारांना 394/- रुपये शुल्क भरावे लागेल. तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथसाठी 294/- रुपये परीक्षा फी लागेल. या पदभरतीसाठी उमेदवारांना 01 ते 21 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरता येणार आहे. चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठीची अंतिम मुदत 25 ऑगस्ट आहे.
किती पगार मिळेल?
सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी 44900/- ते 1,42,400 व इतर संवर्गासाठी 38,600/- ते 1,12,800/- रुपये. व इतर महागाई भत्ते मिळणार
| अधिकृत संकेतस्थळ : | mpsconline.gov.in |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |












