जळगाव लाईव्ह न्यूज | 29 मे 2024 | उन्हाच्या तडाख्याने देशासह संपूर्ण महाराष्ट्र हैराण झाला आहे. अशातच महाराष्ट्रासह इतर सगळ्याच राज्यांना पावसाची चाहूल लागली आहे. परंतु आता लवकरच उन्हाच्या तडाख्यापासून सुटका होणार असल्याचं अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
येत्या दहा किंवा 11 जूनला मुंबईत तर 15 जून पासून मान्सून नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह, मराठवाडा विदर्भ व्यापेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे, दरम्यान महाराष्ट्र सह इतर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड ,उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिसा या राज्यांमध्ये देखील सरासरीपेक्षा 106% अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशात होणाऱ्या या हवामान बदलांमुळे प्रतीक्षेत वाढ होते का असे अनेक प्रश्न डोक वर काढताना दिसत आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर IMD नी दिलेले आहेत,IMD च्या माहितीनुसार बांगलादेशच्या किनारपट्टी भागासह पश्चिम बंगालला धडकलेल्या रेमल चक्रीवादळाची तीव्रता आता कमी होत असून, हे वादळ ताशी 15 किमी इतक्या वेगानं उत्तरेकडे पुढे सरकत असून, त्याची तीव्रता आता आणखी कमी होत जाणार आहे. इतकंच नव्हे, तर या चक्रीवादळाचं रुपांतर आता कमी दाबाच्या पट्ट्यामध्ये होणार आहे.
31 मे किंवा 1 जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होणार आहे. पुढं 11 जूनच्या जवळपास मुंबईत तर 18 ते 20 जून दरम्यान मान्सून वाराणासीमार्गे उत्तर प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये मान्सूनच्या आगमनाची संभाव्य तारीख 15 जून सांगण्यात येत असून, त्याशिवाय मध्यप्रदेशात 15 ते 20 जून दरम्यान मान्सून दाखल होणार आहे. 25 ते 30 जूनदरम्यान राजस्थानमध्ये धडकणार असून, या राज्यांना उकाड्यापासून दिलासा देणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार यंदा गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सर्वसामान्य ते अधिक अशा पर्जन्यमानाची शक्यता आहे.