मान्सूनबाबत मोठी अपडेट ! येत्या ४८ तासात मान्सून केरळमध्ये धडकणार; हवामान विभागाचा अंदाज

जून 2, 2026 6:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२६ । गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या आणि पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. येत्या ४८ तासांत नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी सध्या वातावरण अत्यंत अनुकूल असून, तो लवकरच देशाच्या इतर भागांत आगेकूच करेल, असे हवामान विभागाने आज मंगळवारी स्पष्ट केले.

rain

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ४ जूनच्या सुमारास मान्सूनची वाटचाल गतीने होण्यासाठी परिस्थिती पूरक आहे. मान्सून नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या काही भागांत, लक्षद्वीप बेटांवर, केरळ आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागात पोहोचेल.

बंगालच्या उपसागरातील पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य भागातही मान्सून पुढे सरकणार असून, आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांमध्ये तो ४ जूनपर्यंत विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच उकाड्या पासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात, भारतीय हवामान विभागाने (IMD) आपल्या हंगामी पर्जन्यमानाचा अंदाज खालील दिशेने सुधारित केला. एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या ‘दीर्घकालीन सरासरी’च्या ९२ टक्क्यांवरून तो ९० टक्क्यांवर आणला आणि पावसाळा ‘तूट असलेला’ असण्याची शक्यता ६० टक्के असल्याचे नमूद केले. याचा अर्थ असा की, एकूण पर्जन्यमान ‘सामान्यपेक्षा कमी’ मानले जाण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान मर्यादेपेक्षाही खाली जाण्याची शक्यता ५० टक्क्यांहून अधिक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now