⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

MLC Election : काऊंटडाउन सुरू, मतमोजणीला सुरुवात, थोड्याच वेळात कळणार ‘ते’ १० आमदार कोण?

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या दोन सदस्यांच्या मतदानावर कॉंग्रेस पक्षाने घेतला होता. हा आक्षेप फेटाळला गेला असून मतमोजणीला सुरवात झाली आहे.

आज सकाळी नऊ ते सायंकाळी चार या कालावधीत विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक पार पडली. यात भाजपतर्फे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक या दोन सदस्यांच्या मतदानावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही सदस्यांनी भाजपच्या अन्य आमदारांच्या उपस्थितीत व त्यांच्या मदतीने मतदान केल्याचे कॉंग्रेसने म्हटले असून ही दोन मते रद्द करण्याची मागणी केली आहे.   दुपारी४ वाजेपर्यंत सर्व आमदारांनी मतदान केल. विधानपरिषद निवडणुकीत सर्वांत मोठा मुद्दा गुप्त मतदानाचा होता. गुप्त मतदानामुळे क्रॅास वोटिंग होण्याची दाट शक्यता होती मात्र तस काही झाल नाही. अर्थात भाजपा व महाविकास आघाडी दोघांनाही याचा सारखाच धोका होता. महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी या तिन्ही पक्षात अंतर्गत मतभेद आहेत. राज्यसभा निवडणुकीत याचे परिणाम दिसून आले. हेच गणित आता भाजपाला लागू होते. भाजपाची मोठी डोकंदूखी एकनाथराव खडसेंची आहेत. त्यांना क्रॉस वोटिंग झाल्यास ते सहज निवडून येतील, याची भीती भाजपाला सतावत आहे.