⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

विकासकामांना निधी आणि शासकीय योजनांना पाठपुरावा कमी पडून देणार नाही : आ. चव्हाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 16 जानेवारी 2024 । आमदार म्हणजे कुणी मोठा माणूस नसतो. पूर्वी राजाचा पोटी जन्माला यायचा तो राजा व्हायचा आता जनतेच्या मतपेटीमधून जो जन्माला येतो त्याला लोकप्रतिनिधी म्हणतात. आम्ही म्हणजे राजे नसून जनतेचे सेवक आहोत. शासन आम्हाला पगार व सुविधा देते, त्या तुमच्या सेवेसाठी. म्हणून चाळीसगाव तालुक्याचा आमदार झाल्याच्या पहिल्या मिनिटापासून मी चाळीसगाव वासीयांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. मी तुमच्या सेवेसाठी कामावर असलेला पगारी माणूस आहे. रस्ते, गटार, वाटर आणि मीटर या विकास कामांसोबतच शासनाच्या योजना, सोयी सवलती जनतेला मिळवून देणे, प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक करणे माझे काम आहे. त्यासाठी मी व माझे कार्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

मांदुर्णे गावातील 2 कोटी 65 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यात आ.चव्हाण बोलत होते. गावाच्या विकासासाठी अजून 25 लाखांचा निधी देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. प्रसंगी मांदुर्णे, सायगाव, अलवाडी, भवाळी गावातील 161 हून अधिक आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबाना जात प्रमाणपत्र व रेशनकार्ड वाटप देखील करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, मार्केट कमिटीचे सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, भाजपचे जेष्ठ नेते सुरेशतात्या सोनवणे, रवी आबा पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, किसान मोर्चाचे अध्यक्ष विजय पाटील (पिलखोड), ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदा दगडू पाटील तसेच दगडू गणपत पाटील, उपसरपंच गोरख आत्माराम पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य, सुनील पाटील तसेच मार्केटचे संचालक रवींद्र पाटील, संभाजीराजे पाटील, विकासोचेअरमन जितेंद्र पाटील, संजय गांधी योजना कमिटीचे आबा बछे सायगाव, रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, सायगावच्या सरपंच कमलाबाई भिल्ल, पिलखोड सरपंच यशवंत यशोद, उपसरपंच गोकुळ रोकडे, उपखेडचे सरपंच छोटूभाऊ मगर, गोरख आप्पा पाटील, ज्ञानेश्वर पाटील अलवाडी, दिनेश माळी सायगाव, नाना धर्मराज, विकासोचे माजी चेअरमन राजेंद्र सुभाष पाटील, माजी सरपंच शिवाजी कृष्णा पाटील, नामदेव माधवराव पाटील, वसंत नारायण पाटील, दगडू आत्माराम पाटील, वाल्मिकी नागो पाटील, सयाजी पाटील, पोलीस पाटील विष्णू पाटील तसेच वासुदेव पाटील, कैलास दशरथ पाटील, महेंद्र पाटील, डॉक्टर संदेश महाजन, दगडू उत्तम पाटीलमहेश पाटील, महेश भावसार, पिनू आबा, राजू टेलर, गोरख पाटील, बूथ प्रमुख योगेश पाटील देशमुखवाडी, निहाल मन्सूरी, सोपान अहिरे आदी उपस्थित होते.

या कामांचे झाले लोकार्पण व भूमिपुजन
यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते मांदुर्णे गावातील जलजीवन मिशन अंतर्गत 86 लाखांची पाणी पुरवठा योजना, पिलखोड ते मांदुर्णे रस्ता डांबरीकरण करणे (74.39 लक्ष), साकुर फाटा ते मांदुर्णे रस्ता डांबरीकरण करणे (30 लक्ष), मुलभूत सुविधा निधी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे (25 लक्ष) व सभामंडप बांधकाम करणे (20 लक्ष), जि प शाळा खोली बांधकाम करणे (12.15 लक्ष) शिवाजी पाटील ते छगन पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे (10 लक्ष), सायगाव व मांदुर्णे नदीतून जाणाऱ्या नवीन कृषी वीज वाहिनीचे काम करणे (8 लक्ष) आदी कामांचे लोकार्पण व भूमिपुजन करण्यात आले. तसेच मांदुर्णे येथील आदिवासी भिल्ल कुटुंबाना 73 रेशनकार्ड व 49 जातीचे प्रमाणपत्र, अलवाडी येथील 25 कुटुंबाना रेशनकार्ड, सायगाव येथील 14 कुटुंबाना जात प्रमाणपत्र, भवाळी येथील 06 कुटुंबाना जात प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.