जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्याच्या सीमेवरील मध्य प्रदेश येथील इच्छापुर गावात एक सतरा महीन्याची बालिका दि.२० डिसेंबर रोजी अंगणात खेळत असताना बेपत्ता झाली होती. तब्बल चौथ्या दिवशी बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या याबाबत शहापुर पोलीसात मिसिंग तक्रार दाखल केली होती व कसुन शोध सुरू होता. हरवरल्याच्या घटनेच्या चौथ्या दिवशी शेजारील विहिरीत सदर बालिका मृतावस्थेत आढळून आली. गळा आवळुन निर्दयतेने तिचा खुन करून मृतदेह खताच्या पिशवीत तोंड बांधून विहीरीत फेकुन दिल्याची खळबळजनक घटना २५ रोजी उघडकीस आल्यामुळे अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे.
सविस्तर से की, इच्छापुर येथील सावता माळी वार्डातील कुटुंबातील पती पेट्रॉल पंपावर कामावर तर पत्नी घरात पाणी तापवत असतांना १७ महिन्यांची चिमुरडी कन्या झोपेतुन उठल्यावर स्वेटर व कानटोपी घालून अंगणात खेळत होती.दरम्यान काही क्षणातच गायब झाल्याची बोंब आई, आजी-आजोबांनी फोडली. २० रोजी सकाळी साडेदहाला हि घटना घडली होती. शहापुर पो.स्टेशनला हरविल्याची नोंद केली. जिल्हा पोलीस अधीक्षक राहुलकुमार लोढा व इंदौर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक तिलकसिंह तसेच मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे अंतुर्ली दुरक्षेत्र पोलीसांचा मोठा फौजफाटा इच्छापुर येथे दाखल होवुन शुक्रवारी धडक शोधमोहिम राबविण्यात आली. श्वानपथक विहिरीपर्यत घुटमळल्याने पोलीसांचा संशय बळावला.व त्या अनुषंगाने पोलीसांनी संशयास्पद घरांची झळती घेतली.
मृतदेह बऱ्हाणपुर शासकीय जिल्हा रूग्णालयात तातडीने हलवुन वैद्यकीय अधिक्षक डॉ. गौरव थावनी यांनी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रदिप चौधरी, डॉ.विक्की चौकसे, डॉ. सुरभी शाह यांच्या पथकाने इनकॅमेरा शवविच्छेदन केले. गळा आवळुन खुन केल्याचा व कुकर्म के्ल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त मयत बालिकेचा व्हिसेरा व डिएन ए चाचणीकरीता नख व हाडाचे नमुने राखुन ठेवण्यात आले आहे. शनिवारी शोकाकुल वातावरणात मयत बालिकेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे देखील वाचा :
- Jalgaon : चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी जळगावात आला अन् फसला, पाच दुचाकी जप्त
- जळगाव जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात; टँकरची दुचाकीला धडक, दोन जण ठार
- जळगाव शहरातील हॉटेलमध्येच सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी छापा टाकताच..
- तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश
- जळगाव शहरात अपघाताची मालिका सुरूच: भीषण अपघातात महिलेचा मृत्यू