
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे मुक्ताईनगर तालुक्यातीळ सभासद नसतांना देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ती उमेदवारी रद्द करावी यासाठी खडसेंनी खंडपीठात याचिका दाखल केली होती, मात्र ती औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे. पर्यायी न्यायालयाने खडसेंना दणका दिला आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणूकीत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गट आघाडी यांच्यात जोरदार चुरस आहे.
जिल्हा दूध संघाच्या संचालकपद निवडणूकीच्या अर्जांची छाननीही करण्यात आली आहे. यात २० संचालक निवडीसाठी मतदान होणार आहे. छाननीत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे जगदीश बढे हे रावेर तालुक्यातून बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या पॅनलचा श्रीगणेशा झाला आहे.
एकनाथ खडसे यांच्या पत्नी व संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी दाखल केली आहे, त्यांच्या विरोधात भाजपचे मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर तालुक्यातूनच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चव्हाण यांच्य अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी हरकत घेतली घेवून औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता, खंडपीठात या याचिकेवर आज सुनावणी झाली, न्यायधीश संदीप मारणे यांनी मंदाकिनी खडसे यांची याचिका फेटाळून लावली आहे. तर आमदार चव्हाण यांची उमेदवारी मुक्ताईनगरातून ग्राह्य ठरविली आहे.