जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२५ । धुळवडीनंतर आता सोने आणि चांदीच नाही तर दैनंदिन गरजेच्या वस्तूमध्ये पण मोठी वाढ झाली आहे. आजपासून दुधाच्या किमतींवर 2 रुपयांनी दर वाढ झाली आहे. दूध संघटनांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे.

आधीच महागाईचा चटका सर्वसामान्यांना सगळीकडे बसत असताना आता दुधाच्या दरात वाढ झाली. पुण्यात कात्रज दूध संघाच्या मुख्यालयात सहकारी आणि खासगी दूध संघाची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय झाला आहे.
या दरवाढीनंतर आता गायीचं दूध प्रतिलिटर 58 रूपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर 74 रूपयांना मिळेल.