जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात अपघाताच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून याच दरम्यान बुलडाण्यातून हृदयद्रावक घटना समोर आलीय. ज्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन कॉलेजमध्ये निघालेल्या १९ वर्षीय मुलीचा अपघाती मृत्यू झाला. ॠतूजा सावळे(१९ वर्ष, रा. डोंगरशेवली) असं मृत मुलीचं नाव आहे. ही घटना बुलडाण्यातील डोंगरशेवली गावाजवळ घडली.

ॠतूजा सावळे ही डोंगरशेवली गावातील रहिवाशी होती. ती बुलडाणा येथील राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवारी ॠतूजा महाविद्यालयाला जात होती. त्यावेळी समोरून येणार्या दुचाकीने जोरात धडक दिली. त्यावेळी एका बाजूला जाण्याच्या प्रयत्नात तिचे डोके बसला धडकले अन् ती खाली कोसळली.

स्थानिकांनी अपघातानंतर तात्काळ धाव घेतली अन् ॠतूजाला उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालय बुलडाणा येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ॠतूजाला मृत घोषीत केले. यामुळे संपूर्ण महाविद्यालय व डोंगरशेवली गावावर शोककळा पसरली आहे.
तिच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ॠतुजा एमबीबीएससाठी सुध्दा पात्र झाली होती. डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन ती दररोज कॉलेजला जात होती. पण काळाने घाला घातला अन् ॠतूजाचा मृत्यू झाला.









