⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मनपा महसुलच्या थकबाकीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२१ । शहर मनपाकडे असलेल्या महसूल विभागाच्या १३.३० कोटी थकबाकीबाबत पुनर्गठन किंवा इतर काही मार्गाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महापौर सौ.जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना केली आहे.

जळगाव शहर महानगरपालिकाकडे महसूल विभागाची १३.३० कोटी रक्कम थकित आहे. काही दिवसापूर्वी या रकमेबाबत मनपाची बँक खाती गोठवली जाणार होती. गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या या रकमेबाबत मनपाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता काहीतरी सकारात्मक तोडगा काढावा यासाठी महापौर जयश्री महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. 

यावेळी शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे, जेष्ठ नेते नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, सुनील महाजन, नितीन बरडे,  गणेश सोनवणे, प्रशांत नाईक, सचिन पाटील, जाकीर पठाण आदी उपस्थित होते.