जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात कोमेजलेल्या पिकांना पावसामुळे मिळाली नवसंजीवनी

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ सप्टेंबर २०२२ | जळगाव जिल्ह्यातील आडगावसह मन्याड परिसरातील काही भागात शनिवारी रात्री वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर रविवारी सायंकाळी पुन्हा साडेचार वाजता जोरदार पाऊस झाला. त्यामुळे महिनाभरापासून व्याकुळ असलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर मन्याड धरणाने देखील सत्तरी पार केली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.

rain jpg webp

रविवारी दुपारी जामनेर शहरासह नजीकच्या गावांत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सुमारे दोन तास पाऊस सुरु होता. गुरुवारी झालेल्या पावसानंतर आज पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. शहरातील काही भागात पावसाचे पाणी साचले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. कडक उन व पाणी कमी यामुळे कपाशी पिकाची वाढ खुंटून कोमेजू लागली होती, तर बाजरी फुलोऱ्यातच सोडला होता. रुसून बसली होती. मक्याने तर गुडघ्यावरच तुर्रा काढला होता. भुईमूग जमीनही सोडायला तयार नव्हता अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. हे सारे पाहून शेतकऱ्यांनी धीरच सोडला होता

मात्र परंतु शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला धाऊन आला तो सर्वांचा सुखकर्ता दुखहर्ता गणपती बाप्पा, ज्या दिवसांपासून आगमन झाले त्या दिवसापासून रोजच पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी आनंदी आहे.

Related Articles

Back to top button