⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

अरे बापरे : चोरट्यांनी मारला चक्क दाल- मखणीवर ताव

जळगाव लाईव्ह न्यूज । १ एप्रिल २०२३ । खान्देश महोत्सवात असलेल्या खाद्य स्टॉलवर चोरट्यांनी दाल- मखणीवर ताव मारल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उजेडात आला. या चोरट्यांनी पोटपूजा केल्यानंतर तेथील खाद्यान्नही वाहून नेल्याचे उघड झाल्याने स्टॉलधारक महिलेने शुक्रवारी प्रचंड संताप व्यक्त करीत सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढले.( dal dhokli chori )

गुरुवारपासून येथील सागर पार्क मैदानावर खान्देश महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या महोत्सवात पन्नासपेक्षा जास्त बचत गटांनी स्टॉल लावले आहेत. त्यात येणाऱ्या ग्राहकांसाठीही खान्देशी भरवशावर स्टॉलधारक महिला रात्री घरी परतल्या. तशातच एका स्टॉलवर चोरट्यांनी धडक मारली. तिथे ‘दाल- मखणी’चा आस्वादही घेतला आणि उरलेले पदार्थ सोबत घेऊन चोरटे पसार झाले.

शुक्रवारी दाल- मखणीचे भांडे पुसून साफ केल्याचे लक्षात येताच संबंधित स्टॉलधारक महिलेने अन्य साहित्याची शोधाशोध केली तेव्हा चोरट्यांनी ‘तेल’ही नेल्याचे उघड झाले. ही बाब संबंधित महिलेने आयोजकांच्या लक्षात आणून दिली. चोरट्यांनी अन्य स्टॉलवरही धडक मारली. मात्र, इतरत्र भरपेट खाऊन झालेल्या चोरट्यांनी शेवटी ‘दाल- मखणी’चा ढेकर देत पळ काढला. यासंदर्भात पोलिसात कुठलीही नोंद झालेली नाही.