राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात बंपर भरती ; जळगावात ‘इतके’ पदे रिक्त

डिसेंबर 26, 2023 11:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२३ । तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभागअंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु आहे. पुरवठा निरीक्षक व वरिष्ठ लिपिकपदांसाठी ही भरती होणार आहे. एकूण ३४५ जागा रिक्त असून यात जळगाव जिल्ह्यातील ९ पुरवठा निरीक्षकांची भरती होणार आहे. Maha Food Bharti 2023

Job 6 jpg webp

त्यासाठी पात्र उमेदवांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. लक्ष्यात असू अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२३ असल्याने शेवटचे पाच दिवस अर्ज करण्यासाठी राहिले असून उमेदवारांना लागलीच अर्ज करावा लागणार आहेत.

पदाचे नाव :
1) पुरवठा निरीक्षक (गट-क)
2) वरिष्ठ लिपिक (गट-क)

कुठे किती जागा
पुरवठा निरीक्षक (गट-क) आणि वरिष्ठ लिपिक (गट-क)लिपिकपदासाठी राज्यात सर्वाधिक जागा छत्रपती संभाजीनगर विभागात भरल्या जाणार आहेत असून त्या सोबत पुणे विभागात देखील जागांची संख्या चांगली आहे. कोकण (४७), पुणे (८२), नाशिक ४९), छत्रपती संभाजीनगर (८८), अमरावती (३५) व नागपूर (२३) असे आहे.

शैक्षणीक पात्रता :
पुरवठा निरीक्षक, गट-क- पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)
वरिष्ठ लिपिक (गट-क) – पदवीधर

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही]
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online 

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now