एरंडोलगुन्हेजळगाव जिल्हा

पैशांसाठी विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल येथील माहेर वाशिन असलेल्या विवाहीतेचा २० लाखांसाठी शारिरीक व मानसिक छळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून परदेशात नोकरी करणार्‍या पतीसह सासू, सासरा, दीर, चुलत सासरा, चुलत सासू (सर्व रा.मालेगांव) यांचेविरूध्द एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एरंडोल येथील रहिवासी संजय पाटील यांची मुलगी विशाखा (सध्या नाशिक येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत) चा विवाह मालेगांव येथील उच्चशिक्षित हितेश जगन्नाथ निकम याचेशी 19 मार्च 2019 ला नाशिक येथे मोठ्या थाटामाटात (हॉटेल-लॉनमध्ये सासरच्या इच्छेनुसारच) झाला होता. यासाठी संजय पाटील यांनी विवाह खर्च, सोने-दागिने, मानपान यासाठी सुमारे 25 लाख रूपये खर्च केले होते. विशाखाचा पती हितेश परदेशात मोठ्या कंपनीत, चांगला पगार, नोकरीस असल्याने आणि लग्नानंतर पतीसोबतच परदेशात राहण्याचा नातेवाईकांसह आश्वासन दिले होते. परंतू लग्नानंतर पती हितेशने परदेशात सोबत नेण्यास टाळाटाळ केली. लग्नानंतर थायलंड, इंडोनेशिया येथे फिरावयास नेले असता विशाखास रस्त्यावरच एकटी सोडून निघून गेले. दरम्यान हितेशने विशाखास सांगितले की, माझे परदेशातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध असून तिच्याशीच मला लग्न करावयाचे होते परंतू माझ्या आई, वडीलांच्या इच्छेनुसार आणि फक्त पैशांसाठीच तुझ्याशी लग्न केले आहे. खेदाची बाब म्हणजे हितेश नेहमी दारू पिऊन मला त्रास देणे, मारझोड करणे, सिगारेटचे चटके देणे, जीवे मारण्याची धमकी देणे एवढेच काय माझ्यापासून तुला कोणतेही सुख मिळणार नाही असेही सांगितले. एका मांत्रिकाच्या सांगण्यानुसार नदीकाठी रात्री स्मशानभूमीत पुजा देखील करून घेतली. तसेच गरोदर असतांना मारहाणीमुळे गर्भपात देखील त्याने करण्यास भाग पाडले.

घरासाठी वीस लाख रूपये आणि घर बांधण्यासाठी बँकेकडून 40 लाखाचे कर्ज काढण्यासाठी तगादा लावल्याने सासरकडील लोकांनी देखील मानसिक त्रास दिल्याचे लेखी तक्रारीत म्हटले आहे. शेवटी म्हटले आहे की, पती हितेश निकम, सासू अनुराधा निकम सासरा जगन्नाथ निकम, दीर समीर निकम, चुलत सासू वर्षा निकम, चुलत सासरा राजेंद्र निकम यांनी नाशिक येथे घर घेण्यासाठी तगादा लावला. सर्वांना समजावण्याचा देखील प्रयत्न केले परंतू सासरकडील सर्वच माणूसकी नसलेले असल्याने त्यांचेविरूध्द कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये देखील माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून घरातून बाहेर काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. ज्ञानेश्वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली एरंडोल पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button