⁠ 
मंगळवार, जून 25, 2024

प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिया राठोड जळगावात देणार सेवा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२४ ।पुण्याच्या प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिया राठोड या लवकरच जळगावकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला.

डॉ. प्रिया राठोड या मुळच्या औरंगाबाद येथील रहीवासी असून शासकिय महाविद्यालयातून त्यांनी एबीबीएस पुर्ण केल्यावर बी जे मेडीकल कॉलेज पुणे येथून एम एस पदविका प्राप्त केली आहे.त्याचबरोबर मेडीसिटी गुरगाव दिल्‍ली येथून फेलोशिप आणि डिप्लोमा इन लेप्रोस्कोपी आणि फेलोशिप इन डायग्नोस्टिक आणि ऑपरेटिव्ह हिस्टेरोस्कोपी प्राप्त केली आहे. त्यांनी आतंरराष्ट्रीय जर्नल संशोधन देखिल प्रसिध्द केले असून व्हीएनएमसी यवतमाळ, लक्ष हॉस्पीटल भंडारा येथे विविध पदावर काम करण्याचा देखिल अनुभव आहे.

दुर्बिणव्दारा शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा असून २५०० च्या वर शस्त्रक्रिया आतापर्यंत त्यांनी केलेल्या आहेत. याचबरोबर सिझेरीयन, नॉर्मल प्रसुती करतांना त्यांनी अनेक गर्भवती महिला व बाळांना जिवदान दिले आहे. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी आज त्यांची नियुक्‍ती डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात केली असून त्यांच्या अनुभवाचा निश्‍चीतच रूग्णांना फायदा होइल असा विश्‍वास व्यक्‍त करत शुभेच्छा दिल्यात. दरोरोज सकाळी ९ ते ५ या वेळेत त्या रूग्णालयात स्त्रीरोग विभागात उपलब्ध राहणार असून जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनाने केले आहे.