आमदार राजूमामा भोळे २८ रोजी उमेदवारी दाखल करणार

ऑक्टोबर 25, 2024 2:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात साध्य विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सर्वच पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यात देखील महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झाले आहेत. जळगाव शहरातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार सुरेश भोळे हे दि. २८ रोजी उमेदवारी दाखल करणार आहेत. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले जाणार होणार यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती राहील.

Suresh Bhole RajuMama jpg webp

यापूर्वी काल गुरुवारी जळगाव ग्रामीणचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी दाखल केली. तसेच पाचोरामधून किशोर पाटील, मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटील, अमळनेर मधून अनिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर आता महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार सुरेश भोळे दिनांक २८ रोजी उमेदवारी दाखल करणार आहेत. ३ मंडळ अध्यक्षासह सर्व पदाधिकारी अर्ज भरतांना हजर राहणार असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now