जळगाव जिल्हायावल

मनोज माहेश्वी व राहुल पाटील यांचा मनसेत प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल येथील आयटी इंजि. राहुल पाटील व सामाजिक कार्यकर्ते मनोज माहेश्वी यांनी आज जळगाव येथे मनसेत प्रवेश केला. यावेळी मनसे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे जनहित कक्ष व विधी विभाग नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष राकेश पेडणेकर, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनभेरू व जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा भाऊ रोटे, जनहित रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.

यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, जनहीत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रज्जाक सय्यद, संदीप मांडोळे, यावल येथील शहराध्यक्ष किशोर नन्नवरे, श्याम पवार, अजय तायडे, गौरव कोळी, अनिल सपकाळे, गजेंद्र माळी, कुणाल बारी, रस्ते व आस्थापनाचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम व मुक्ताईनगरचे अतुल जवरे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button