जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । केसीई सोसायटी संचालित मू.जे. महाविद्यालय जळगाव (स्वायत्त) अंतर्गत सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीद्वारे आतापर्यंत तीन वेळा रेकी चिकित्सा पद्धती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पूर्वीच्या या रेकी कार्यशाळांचा प्रतिसाद बघता रविवार दि. ३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळात चौथ्यांदा रेकी चिकित्सा लेव्हल – १ कार्यशाळेचे पुन्हा आयोजन करण्यात येत आहे.

आपले शारीरिक, मानसिक आरोग्य, पारिवारिक सामंजस्य, मनोकामना पूर्ती, उत्कृष्ट नातेसंबंध, आध्यात्मिक प्रगती यासाठी रेकी चिकित्सा पद्धतीचा लाभ लोकांना मोठ्या प्रमाणात होत असल्याचे अनुभव पूर्वीच्या कार्यशाळेतील सहभागी लोकांनी व्यक्त केला त्या अनुषंगाने नवीन लोकांना रेकीचा लाभ घेण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून ऋषिकेश उत्तराखंड येथील ग्रँड रेकी मास्टर डॉ. तनु वर्मा उपस्थित राहाणार आहेत. डॉ. तनु वर्मा यांनी आतापर्यंत देश विदेशात योगाच्या अनेक कार्यशाळा घेतल्या असून रेकीच्या सुद्धा त्या उत्तम जाणकार आहेत. रेकी चीकीत्स्येचा लाभ घेण्यासाठी रेकीच्या अनेक लेव्हल पैकी किमान पहिल्या दोन लेव्हल सर्वसामन्यांना आपल्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. रेकी च्या माध्यमातून आपल्याला स्वत:वरच नव्हे तर इतरांवर सुद्धा दूरस्थ पद्धतीने उपचार करता येतात. त्यासाठी सराव कसा करावा याची सविस्तर माहिती रेकी लेव्हल – १ च्या कार्यशाळेत दिली जाते. रेकी ही एक एनर्जी हिलिंग प्रक्रिया असून त्याद्वारे आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्र प्रभावित केले जातात आणि आपल्या अनेक समस्या या एनर्जीचा यथायोग्य विनियोग करून दूर केल्या जातात. ही दिव्य अनुभूती घेण्यासाठी आणि अनेक समस्यांतून आपली मुक्तता करून घेण्याच्य हेतूने ३ एप्रिल रोजी आयोजित कार्यशाळेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी चे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी केले. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी, मू. जे. महाविद्यालय जळगाव येथे संपर्क साधावा.







