⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पिकांवर आला कुकुंबर मोझॅक, वाचा काय सांगत आहेत कृषी तज्ज्ञ डॉ.के बी.पाटील


जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप। जळगाव जिल्ह्यात केळीवर कुकुंबर मोझॅक आजाराने थैमान घातले आहे. कृषी विभागाकडून संसर्गजन्य केळी बागेचा सर्वेक्षण करण्यात आला आहे. अशावेळी स्वच्छता राखत शेती करण्याचे अवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी नक्की कोणती काळजी घ्यावी, यासाठी कृषीतज्ज्ञ डॉ के.बी.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘जळगाव लाईव्ह’ला महत्वाची माहिती दिली. (Cucumber mosaic)

यावेळी डॉ.के.बी.पाटील यांनी सांगितले कि, जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कुकुंबर मोझॅक आजाराचा प्रादुर्भाव झाला नसून मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यामध्ये कुकुंबर मोझॅकचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हा प्रादुर्भाव किडीमुळे होतो. यामुळे या सर्व किड संपवणं अतिशय गरजेच आहे. मावा, पांढरी माशी अशा प्रकारच्या किडी संपवणं महत्त्वाचं असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी वेळोवेळी कीटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे असल्याचे यावेळी पाटील म्हणाले.

त्याचबरोबर पुढे ते असेही म्हणाले की, जुलै, ऑगस्टमध्ये किडी वाढतात. यामुळे कुकुंबर मोझॅक आजार वाढतो. असा अंदाज गेल्या तीन वर्षाच्या संशोधनातून निष्पन्न झाला आहे. पुढे ते असेही म्हणाले की, समजा सी.एम.व्ही वर अंकुश ठेवायचा असेल तर त्यासाठी केवळ आणि केवळ शास्त्रशुद्ध पद्धतीचाच उपयोग केला गेला पाहिजे. यामुळे या आजारावर लवकर अंकुश मिळवता येईल.

फवारणीसाठी औषधांचे प्रमाण

१५ लिटर पंपासाठी औषधांचे प्रमाण

१) इमिडाक्लोप्रीड – ( इमिडा/कॉनफीडॉर) १० मिली + ॲसिफेट पावडर १५ ग्रॅम + निंबोळी अर्क ३० मिली.
२) एसिटामाप्राईड – (टाटामाणिक/एक्टारा) ८ ग्रॅम + एसिफेट १५ ग्रॅम + निंबोळी अर्क ३० मिली.
३) थायोमिथॉक्झाम – (एक्टारा) ७ ग्रॅम + एसिफेट १५ ग्रॅम + निंबोळी अर्क ३० मिली
४) डायफेंथीयुरॉन (पोलो) ८ ग्रॅम + एसिफेट १५ ग्रॅम + निंबोळी अर्क ३० मिली
५) फिप्रोनील १५ मिली + एसिफेट १५ ग्रॅम + निंबोळी अर्क ३० मिली
६) फ्लोनिक्यामाइड (उलाला) ८ मिली + एसिफेट १५ ग्रॅम + निंबोळी अर्क ३० मिली

वरील प्रमाणे किटकनाशकांची फवारणी केळीवर, बांधावर व शेजारील पिकांवर दर ५ ते ६ दिवसांनी नचुकता करावी.