⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

एक दिवसीय विनामूल्य घेण्यात येणाऱ्या सायबर सुरक्षा जनजागृतीचा कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । जिल्ह्यातील वढत्या गुन्हेगारीमुळे आपल्याला आपला बचाव कसा करता येईल यासाठी सायबर सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाची जिल्हाभरातील सर्व महिला, विद्यार्थीनी, गृहिणी, शिक्षीका तसेच इतर काम करणाऱ्या महिलांसाठी सायबर सुरक्षा व जनजागृती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

समृध्दी महिला मंडळ, जळगाव व मेकरॉकर टेक्नॉलॉजी इन्स्टीटयुशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ जुलै रोजी ४.०० वाजता रोटरी हॉल, मायादेवी नगर, जळगाव या ठिकाणी जिल्हाभरातील सर्व महिला, विद्यार्थीनी, गृहिणी, शिक्षीका तसेच इतर काम करणाऱ्या महिलांसाठी सायबर सुरक्षा व जनजागृती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरहू कार्यक्रमात प्रामुख्याने हॅकींग काय असते व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो तसेच यापासुन स्वतःची व आपल्या परिवाराची सुरक्षा आपण कशी करावी या विषयी आपणास मार्गदर्शन केले जाणार आहे.