Chalisgaon : क्रूझर व दुचाकीच्या भीषण अपघात; चाळीसगावची महिला ठार, सहा जण जखमी

जानेवारी 20, 2025 5:03 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढतं दिसताना दिसत असून अशातच क्रूझर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार तर सहा जण जखमी झाले. ही घटना धुळे-सोलापूर महामार्ग क्रमांक २११ वर चाळीसगाव शहरालगत रांजणगाव फाट्यावर घडली. चंदाबाई मलखान पवार (वय ७०) रा. कोंगानगर ता. चाळीसगाव असे मृत महिलेचे नाव आहे.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

चाळीसगाव तालुक्यातील खेडें तांडा येथील कृष्णा संजय जाधव हा रविवारी दुपारी मोटारसायकल क्र. एमएच १९ एएस ८४७३ वर त्याची आजी चंदाबाई पवार यांना घेवून चाळीसगाव कडे येत होता. तेव्हा रांजणगाव फाट्यावर चाळीसगावकडून छत्रपती संभाजीनगर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रूझरची (एमएच २० सीएच ६५२२) व दुचाकी समोरासमोर धडक झाल्याने मोटारसायकलवरील चंदाबाई पवार यांचा जागीच मृत्यू झाला.

तर मोटारसायकल चालक कृष्णा जाधव याच्यासह क्रूझर मधील चालक व प्रवासी असे सहा जण जखमी झाले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत क्क्रुझर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन उलटले. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थ व वाहन चालकांनी मदतीसाठी धाव घेत जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलवले. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now