---Advertisement---
वाणिज्य

फेब्रुवारी महिन्यात बँकिंग नियमात मोठे बदल; दंड टाळण्यासाठी जाणून घ्या..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । फेब्रुवारी महिन्यात बँकिंग सेक्टरमध्ये अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत, ज्याबाबत ग्राहकांना तातडीने माहिती घेणे आवश्यक आहे. या नव्या ४ नियमांचे पालन न करण्यासाठी खातेदारांना दंड भरावा लागू शकतो. या बदलांमध्ये बँक खात्यातील किमान शिल्लक रक्कम, एटीएम ट्रांजेक्शनच्या मर्यादा, ठेवींवरील शुल्क, आणि क्रेडिट कार्ड नियमांचा समावेश आहे.

bank

बँक खात्यातील किमान शिल्लक रक्कम
एसबीआयने त्याच्या बचत खात्यातील किमान शिल्लक रक्कमेच्या नियमात बदल केला आहे. आता एसबीआय खातेदारांना त्यांच्या खात्यात कमीत कमी ५००० रुपयांची शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे, जी आधी ३००० रुपये होती. पंजाब नॅशनल बँकेने देखील किमान शिल्लक रक्कम १००० रुपयांनी वाढवून ३५०० रुपये केली आहे, तर कॅनरा बँकेने ही मर्यादा २५०० रुपये केली आहे.

---Advertisement---

एटीएम ट्रांजेक्शनची नवी मर्यादा
फेब्रुवारी महिन्यापासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल झाले आहेत. मेट्रो शहरातील ग्राहकांना महिन्यातून ३ वेळा एटीएममधून पैसे काढणे मोफत आहे, त्यानंतर प्रत्येक ट्रांजेक्शनसाठी २५ रुपये शुल्क आकारले जाईल. दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास ३० रुपये शुल्क लागू होईल. नॉन-मेट्रो शहरात ही मर्यादा ५ रुपयांची आहे.

ठेवींवर शुल्क
कोटक महिंद्रा बँकेने बचत खात्याच्या नियमात बदल केले आहेत. १०००० रुपयांहून अधिक रोख ठेवींसाठी प्रति १००० रुपयांसाठी प्रति महिना ५ रुपये शुल्क लागू होणार आहे. नॉन-कोटक एटीएमसाठी एटीएम डिक्लाइन फी २५ रुपये लागू होईल, तर स्टँडिंग इंस्ट्रक्शन फेलिअर फी २०० रुपयांवरून १०० रुपये केली आहे.

IDFC फर्स्ट क्रेडिट कार्ड
२० फेब्रुवारीपासून आयडीएफसी फर्स्ट क्रेडिट कार्डमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. कार्ड रिप्लेसमेंट फीमध्ये आता १९९ रुपये + कर भरावा लागणार आहे. याव्यतिरिक्त, CRED आणि PayTM सारख्या प्लॅटफॉर्मसाठी एज्युकेशन पेमेंटसाठी नवे शुल्क लागू होणार आहे.

व्याजदरांवर ठेवा
रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनंतर रेपो रेटमध्ये कपात केली आहे, ज्यामुळे बँकेचे कर्ज स्वस्त होणार आहे. या बदलामुळे मुदत ठेवीवरील व्याजदरातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---