⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Mahindra च्या नवीन Scorpio N च्या किंमतीबाबत मोठा खुलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । महिंद्राने नवीन Scorpio-N लाँच केली आहे. नवीन स्कॉर्पिओची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये आहे आणि टॉप व्हेरियंटची किंमत 19.49 लाख रुपये आहे. मात्र, यासोबतच कंपनीने असेही म्हटले आहे की, नुकत्याच जाहीर झालेल्या किमती पहिल्या 25 हजार बुकिंगसाठी आहेत. अशा परिस्थितीत कंपनी नंतर आपल्या किमती वाढवू शकते. जर तुम्ही ही कार घेण्याचा विचार करत असाल तर आम्‍ही तुम्‍हाला तिच्या किंमतीबद्दल आणि तिच्या फिचर्सबद्दल सांगणार आहोत.

Scorpio-N च्या किमतींपासून सुरुवात करूया. Z2 पेट्रोल MT व्हेरियंटची किंमत 11.99 लाख रुपये, Z2 डिझेल MT व्हेरियंटची किंमत 12.49 लाख रुपये, Z4 पेट्रोल MT व्हेरियंटची किंमत 13.49 लाख रुपये, Z4 डिझेल MT व्हेरियंटची किंमत 13.99 लाख रुपये, Z6 डिझेल MT व्हेरियंटची किंमत आहे. पेट्रोलची किंमत 9 लाख रुपये आहे. व्हेरिएंटची किंमत 16.99 लाख रुपये, Z8 डिझेल MT व्हेरिएंटची किंमत 17.49 लाख रुपये, Z8 L पेट्रोल MT व्हेरिएंटची किंमत 18.99 लाख रुपये आणि Z8 L डिझेल MT व्हेरिएंटची किंमत 19.49 लाख रुपये आहे. या सर्व एक्स शोरूम किमती आहेत.

30 जुलैपासून टेस्ट ड्राईव्ह
नवीन स्कॉर्पिओचे बुकिंग 30 जुलैपासून सुरू होईल. नवीन स्कॉर्पिओचे ऑनलाइन बुकिंगही करता येणार असून महिंद्रा 5 जुलैपासून 30 शहरांतील शोरूममध्ये टेस्ट ड्राइव्हसाठी नवीन स्कॉर्पिओ सादर करेल. नवीन स्कॉर्पिओ-एन सध्याच्या स्कॉर्पिओसोबत विकली जाईल. नवीन एसयूव्हीला आधुनिक डिझाइन देण्यात आले असून सध्याच्या मॉडेलपेक्षा ती खूप मोठी असणार आहे. महिंद्र स्कॉर्पिओच्या फ्रंटला ग्रील देण्यात आली आहे, त्यामुळे तिचा लूक काहीसा XUV700 सारखा दिसून येतो आहे. नवीन स्कॉर्पिओ ही दुसरी अशी कार आहे, ज्यात महिंद्राच्या नवीन लोगोचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी XUV700 नवीन लोगोसह दाखल करण्यात आली होती.

असे असणार सेफ्टी फीचर्स
नवीन स्कॉर्पिओ 6 एअरबॅगसह येते. डायनॅमिक एलईडी टर्न इंडिकेटरसह नवीन एसयूव्ही एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, सी-आकाराचे डेटाइम रनिंग एलईडी आणि फ्रंट बंपरवर एलईडी फॉग लॅम्प यांसारखी वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ-एनमध्ये सर्व नवीन 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट टेक्नीक वापरली गेली आहे. यासोबतच कंपनीने या एसयूव्हीमध्ये सोनीचे 12 स्पीकर देखील सादर केले आहेत.

दमदार फीचर्सचा समावेश
नवीन स्कॉर्पिओमध्ये व्हॉईस कमांड आणि क्रूझ कंट्रोल फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने 2.0 लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनसह नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ एन सादर केली आहे. चेन्नईच्या महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये हे प्रोडक्ट तयार करण्यात आले आहे. नवीन स्कॉर्पिओची रचना महिंद्रा इंडिया डिझाईन स्टुडिओमध्ये करण्यात आली आहे.