जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२२ । यावल तालुक्यातील महेलखेडी येथील 24 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केलीय. लग्नाच्या तिन महीन्यात त्याची फारकत झाली होती. त्यातून तो काही काही दिवसापासुन मानसिक तणावाखाली होता. या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. रहीम बिस्मिल्ला देशमुख (वय २४) असे या मृत तरुणाचे नाव असून गावात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेलखेडी येथील रहीम देशमुख या तरूणाने सोमवारी ३१ ऑक्टोबर रोजी कोरपावली शिवारातील विलास भागवत पाटील यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडून आत्महत्या केली. रहीम देशमुख हा तरूण सोमवार सायंकाळच्या ५ वाजेपासुन घराबाहेर निघाला होता, तो रात्री घरी न आल्याने कुटुंबातील मंडळींनी गावातील वनांतेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळाला नाही.
मंगळवारी १ नोव्हेबर रोजी पुन्हा महेलखेडी गावच्या गावठाण शिवारात त्याचे नातेवाईक शोध घेत असतांना विलास पाटील यांच्या शेतातील विहीरी जवळ त्याची चप्पल दिसुन आली. शोध घेणाऱ्यानी विहीरीत डोकावुन पाहीले असता विहीरीच्या पाण्यात त्याचा मृतदेह दिसुन आला. रहीम देशमुख याचा ६ महीन्यापुर्वीच लग्न झाले होते. लग्नाच्या तिन महीन्यानंतरच त्याची फारकत झाल्याने विवाहीत जिवन पत्नीच्या घटस्फोटाने संपुष्टात आल्याने तो मागील काही दिवसापासुन मानसिक तणावाखाली होता, असे बोलले जात आहे.
याबाबत यावल पोलीस ठाण्यात मयताचे काका अब्दुल फतु देशमुख यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रहीम देशमुख यांच्या मृतदेहावर यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशमुख यांनी केले.