गुरूवार, जून 8, 2023

अमळनेरमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचं : शिंदे – भाजप झाले चितपट

जळगाव लाईव्ह न्यूज | ३० एप्रिल २०२३ |  अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लागलेल्या निकालात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर शिंदे – भाजप पराभूत झाले आहे.

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निकालाचा आज दुसरा टप्पा होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ११ जागांवर त्यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे तीन माजी आमदार यांच्या नेतृत्वाखालीअसलेल्या भाजपच्या पॅनलला धोबीपछाड मिळाली आहे.याठिकाणी भजपला माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले आहे.

आमदार अनिल पाटील यांच्यासह, भाजपच्या तीन माजी आमदारांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.मात्र अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचाच बोलबाला दिसून आला.