10वी/ITI उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी!! ‘महापारेषण’ अंतर्गत जळगावात भरती

ऑगस्ट 9, 2023 4:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही दहावी, आयटीआय उत्तीर्ण असाल आणि जॉबच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड अंतर्गत जळगाव येथे भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 37 जागा भरल्या जाणार आहे. MahaTransco Bharti 2023

MahaTransco 1 jpg webp

त्यानुसार पात्र उमेदवार संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 14 ऑगस्ट 2023 निश्चित करण्यात आलेली. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. MahaTransco Recruitment 2023

रिक्त पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
आवश्यक पात्रता जाणून घ्या?
या भरतीसाठी उमेदवार इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण) असावा तसेच
मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षाचा आय.टी.आय. (वीजतंत्री) परीक्षा उत्तीर्ण केल्याचे सर्व सेमिस्टरचे एकत्रित गुणपत्रक अपलोड करणे अत्यावश्यक आहे.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑगस्ट 2023

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 30 वर्षापर्यंत असावे. तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट मिळेल.
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाईल.

अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

भरतीची अधिसूचना पहा : PDF
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now