खुशखबर! महाराष्ट्रात तलाठी पदाच्या मेगाभरतीबाबत शासनाकडून आदेश जारी

जून 3, 2023 2:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही तलाठी भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजेच राज्यातील तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठीची मेगाभरती केली जाणार असून यासंदर्भात राज्य सरकारने आदेश देखील काढले आहेत. Maharashtra Talathi Bharti 2023

talathi bhrti 2 jpg webp

काय म्हटलं आहे आदेशात?
राज्य सरकारच्या महसूल आणि वन विभागाकडून आदेश निर्गमित करण्यात आलेले असून त्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गटज्ञक) संवर्गातील तब्बल 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करिता राज्यातील 36 जिल्ह्यात ऑनलाइन पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दि. 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचे देखील आदेशात नमुद करण्यात आलेले आहे.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी-जास्त) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा, सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

या भरती अंतर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण 208 जागा रिक्त आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now