---Advertisement---
नोकरी संधी

ग्रॅज्युएट्स पाससाठी राज्य सरकारी नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स!! त्वरित करा अर्ज..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर राज्य सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र सहकार आयुक्त अंतर्गत भरती होणार असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 309 जागा भरल्या जातील.

job jpg webp webp

पदवी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी असणार आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने www.sahakarayukta.maharashtra.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023  आहे.

---Advertisement---

या’ पदावर होणार भरती
1) सहकारी अधिकारी श्रेणी 1 – 42
2) सहकारी अधिकारी श्रेणी २- 63
3) लेखापरिक्षक श्रेणी २ -07
4) सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक- 159
5) उच्च श्रेणी लघुलेखक- 03
6) निम्न श्रेणी लघुलेखक -27
7) लघुटंकलेखक – 08

भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?

सहकारी अधिकारी श्रेणी 1 – : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान वितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहकारी अधिकारी श्रेणी 2- : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण
लेखापरिक्षक श्रेणी 2 -: मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक- : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण
उच्च श्रेणी लघुलेखक- : 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 120 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
निम्न श्रेणी लघुलेखक – : 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुटंकलेखक – : 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

वयाची अट –18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक – 900/- रुपये]

तुम्हाला इतका पगार मिळेल?
सहकारी अधिकारी श्रेणी 1 -38600-122800
सहकारी अधिकारी श्रेणी 2 – 35400-112400
लेखापरिक्षक श्रेणी 2 – 35400-112400
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक – 25500-81100
उच्च श्रेणी लघुलेखक – 41800-132300
निम्न श्रेणी लघुलेखक – 38600-122800
लघुटंकलेखक – 25500-81100
सर्व पदांना अधिक महागाई भत्ता व नियमानुसार इतर भत्ते देय लागू राहील

वेबसाईट : www.sahakarayukta.maharashtra.gov.in

अधिसूचना पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी कारण्यासाठी : Click Here

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---