मोठी बातमी ! किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच सुरु राहणार

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं १ मेपर्यंत निर्बंध घातले आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा आणि किराणामाल खरेदीसाठी परवानगी देण्यात आली आहे.  निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते  ११ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

राज्यातील रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा वाढवणे, ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणी दूर करणे आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.