⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

Maharashtra Budget! राज्याच्या अंगणवाडी सेविकांसह शिक्षकसेवकांच्या मानधनात मोठी वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२३ । महाराष्ट्राचा वर्ष २०२३ चा अर्थसंकल्प आज सभागृहात मांडला जात आहेत. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. सोबतच शिक्षकसेवकांचे मानधनही वाढ करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली.

किती वाढले शिक्षकसेवकांचे मानधन?
पगारवाढीच्या प्रतिक्षेत असेलेल्या राज्यातील शिक्षक सेवकांना राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी शिक्षक सेवकांसाठी सरासरी १० हजार रुपयांची भरघोस मानधन वाढ करण्याची घोषणा केली आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक सेवकांचे मानधन ६००० रुपयांवरून १६००० रुपये होणार आहे. माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन ८००० रुपयांवरून १८००० रुपये करण्यात येणार आहे, तर उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचे मानधन ९००० रुपयांवरून वाढवून २०००० रुपये करण्यात येणार आहे.

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली