जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । आरोग्य क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी गट-अ पदासाठी ही भरती होणार आहे. Arogya Vibhag MO Bharti 2026

एकूण 1440 रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. Arogya Vibhag MO Recruitment 2026

पदांचा तपशील
वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO)-MBBS – 766 जागा
वैद्यकीय अधिकारी गट-अ (MO) विशेषज्ञ – 774 जागा
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1 (MO-MBBS): MBBS पदवी आवश्यक
पद क्र.2 (MO विशेषज्ञ): वैद्यकीय पदव्युत्तर पदवी/पदविका किंवा समतुल्य पात्रता आवश्यक
वयोमर्यादा आणि परीक्षा फी:
20 मार्च 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे. मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटक (आ.दु.घ.) उमेदवारांना 5 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे. सोबतच याभरतीसाठी परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. खुला प्रवर्गातील उमेदवारांना ₹1000/- रुपये तर मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/महिला/खेळाडू यांना ₹700/- रुपये फी भरावी लागणार आहे.
किती पगार मिळेल?
या भरतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये वेतन दिलं जाणार आहे.












