ग्रॅज्युएट्स पाससाठी राज्य शासनाच्या नोकरीची संधी; लेखा व कोषागार संचालनालयात जम्बो भरती..

डिसेंबर 29, 2024 3:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाची नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती होणार आहे. या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 75 जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहे .

Mahakosh Bharti

विशेष म्हणजेच पदवी पास असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी असणार आहे. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेला 31 डिसेंबर 2024 पासून सुरुवात होणार आहे. आणि 30 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : कनिष्ठ लेखापाल (गट क)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट : 30 जानेवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]

पगार : 29,200/- ते 92,300/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जानेवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now