MPSC परीक्षेत पाचोऱ्यातील माधुरी राज्यातून १० व्या क्रमांकाने उत्तीर्ण

मार्च 25, 2022 1:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पाचोरा तालुक्यातील वरखेडी माधुरी चौधरी हिने घवघवीत यश संपादन केले. ती राज्यातुन १० व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला आहे.

mpsc madhuri chaudhari jpg webp

येथील अशोक पुंडलिक चौधरी यांची कन्या आहे. माधुरी हिचे बालपणीचे शिक्षण हे वरखेडी गावात झाले असुन तिने उच्च शिक्षण हे जळगांव येथील एस. एस. मणियार लाॅ विद्यालयात घेऊन एल. एल. एस. पदवी प्राप्त केली. तद्नंतर माधुरी चौधरी हिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परिक्षेत सहभाग घेवुन राज्यातुन १० व्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान पटकावला.

तिला वरखेडी येथील योगेश जाधव, गणेश शिरसाठ सह मित्र परिवाराचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. माधुरी चौधरी हिचे परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now