आज चंद्रग्रहण : जाणून घ्या तुमच्यावर कसा होईल ग्रहणाचा परिणाम

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ ।  दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी मंगळवारी , कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे . ग्रहण ग्रस्तोदित म्हणजे ग्रस्त असलेले ग्रहण सुरू झालेले चंद्रबिंब उदयाला येईल . त्यामुळे भारतात ग्रहण स्पर्श दिसणार नाही . पूर्व भारतात मात्र खग्रास चंद्रग्रहण दिसेल , तर उर्वरित भारतात खंडग्रास चंद्रग्रहण दिसेल . भारतासह पूर्ण आशिया , ऑस्ट्रेलिया , पूर्व अमेरिका व दक्षिण अमेरिका या देशात ग्रहण दिसेल .

. !! ग्रहणाचा वेध !!

हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी ८ नोव्हेंबर च्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजे सायंकाळी ६:१९ पर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत . बाल , वृद्ध , अशक्त , आजारी आणि गर्भवती यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत . वेधामध्ये भोजन करू नये . स्नान , जप , देवपूजा , श्राद्ध , इत्यादी करता येतील . तसेच पाणी पिणे , झोपणे , मलमूत्रोत्सर्ग करता येईल . ग्रहण पर्वकाळात म्हणजे आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून ते सायंकाळी ६:१९ पर्यंत या काळात पाणी पिणे , झोपणे , मलमुत्रोत्सर्ग ही कर्म करू नयेत .

. !! ग्रहणातील कृती !!

सूर्यास्त होतात स्नान करावे . पर्व कालामध्ये देवपूजा , तर्पण , श्राद्ध , जप , होम व दान करावे . पूर्वी घेतलेल्या मंत्रांचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे . ग्रहण मोक्षानंतर परत स्नान करावे . अशौच असता ग्रहणकालात ग्रहणा संबंधी स्नान , दान करण्यापूर्ती शुद्धी असते .

. !! ग्रहणाचा पर्वकाळ !!

. ग्रहण स्पर्श :- १४:३९
. ग्रहण मध्य :- १६:३०
. ग्रहण मोक्ष :- १८:१९

वरील वेळा संपूर्ण भारताकरता आहेत .

. !! ग्रहणाचे राशी परत्वे फल !!

मिथुन , कर्क , वृश्चिक , कुंभ या राशींना शुभफल .

सिंह , तुला , धनु, मीन या राशींना मिश्र फल .

मेष , वृषभ , कन्या , मकर या राशींना अनिष्ट फळ आहे .

ज्या राशींना अनिष्ट आहे , त्या राशींच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये .