भुसावळमार्गे या दोन शहरांदरम्यान 44 विशेष गाड्या धावणार ; जाणून घ्या वेळापत्रक आणि थांबे..

फेब्रुवारी 13, 2026 1:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्ये रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) आणि प्रयागराज दरम्यान 44 साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. विशेष या गाडीला भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आला असून यामुळे प्रवाशांची सोय होणार असून या विशेष सेवेमुळे होळी व उन्हाळी हंगामातील अतिरिक्त प्रवासी भार कमी होण्यास मदत होणार आहे.

train

०४१०२ साप्ताहिक विशेष गाडी १७ फेब्रुवारी ते १४ जुलै २०२६ दरम्यान प्रत्येक मंगळवारी दुपारी ०४.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी रात्री ००.५० मिनिटाने भुसावळ स्थानकावर पोहोचेल. यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ०५.०० वाजता प्रयागराज येथे पोहचेल. या गाडीच्या एकूण २२ फेऱ्या होणार आहेत. त्यापैकी १७ ते २४ फेब्रुवारी आणि ०७ ते १४ एप्रिल कालावधीत ०४ फेऱ्या, ०३ ते ३१ मार्च दरम्यान होळी विशेष ०५ फेऱ्या तसेच २१ एप्रिल ते १४ जुलै दरम्यान उन्हाळी विशेष १३ फेऱ्या होतील.

०४१०१ साप्ताहिक विशेष गाडी १६ फेब्रुवारी ते १३ जुलै दरम्यान प्रत्येक सोमवारी सायंकाळी ०६.०० वाजता प्रयागराज येथून सुटेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी ७.५० ला भुसावळला पोहोचेल. यानंतर त्याच दिवशी दुपारी २.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. या गाडीच्या एकूण २२ फेऱ्या होतील. पैकी १६ ते २३ फेब्रुवारी आणि ०६ ते १३ एप्रिल या कालावधीत अतिरिक्त विशेष ०४ फेऱ्या होतील. त्याचप्रमाणे ०२ ते ३० मार्च कालावधीत होळी विशेष ०५ फेऱ्या होतील. २० एप्रिल ते १३ जुलै कालावधीत उन्हाळी विशेष १३ फेऱ्या होतील.

थांबा कुठे?
या विशेष गाड्यांना कल्याण, इगतपुरी (फक्त 04102 साठी), नाशिक, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर येथे थांबा देण्यात येईल. गाडीची रचना एक वातानुकूलित द्वितीय, 4 वातानुकूलित तृतीय, 9 शयनयान, 8 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसन तसेच सामानासह 2 गार्ड ब्रेक व्हॅन अशी असेल.

ट्रेन क्रमांक 04102 साठी आरक्षण 14 फेब्रुवारी 2026 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in वर सुरू होईल. अनारक्षित डब्यांसाठी तिकीट UTS प्रणालीद्वारे उपलब्ध राहील. प्रवाशांना अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES ॲपचा उपयोग करता येईल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now