⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

महागाईचा मोठा झटका, गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ ; जाणून घ्या नवे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२२ । आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य होरपळून निघत असतानाच अशातच आता घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी आज 6 जुलैच्या सकाळपासून कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग केले आहेत. यासोबतच जळगावात गॅस सिलिंडरची किंमत 1058 रुपयांवर पोहोचली आहे. LPG Cylinder Rate Hike

दरम्यान, दुसऱ्या बाजूला व्यवसायिक कारणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीत एका महिन्यात दुसऱ्यांदा कपात झाली आहे. व्यवसायिक सिलिंडरची किमती 8.50 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. याआधीही 1 जुलै रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत (LPG Commercial Cylinder Price) 198 रुपयांची मोठी कपात केली होती. त्यानंतर आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरही स्वस्त होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आता कंपन्यांनी किंमत वाढवून सर्वसामान्यांना धक्का दिला आहे.घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत याआधी १९ मे रोजी बदल करण्यात आले होते.

1 जुलै रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडर 2021 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला. आता 6 जुलै रोजी किमतीत आणखी कपात केल्यानंतर ती 2012.50 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईत 1972.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 2177.50 रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी १९ मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला होता.

200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी
जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत सिलेंडरमागे २०० रुपये सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला फक्त 12 सिलिंडरपर्यंत उपलब्ध असेल. सरकारच्या या निर्णयाचा 9 कोटींहून अधिक ग्राहकांना फायदा झाला आहे.