---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र राजकारण

उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम यांचा पराभव

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । मूळ जळगावचे असलेले भाजपचे उमेदवार प्रसिद्ध वकील ऍड उज्ज्वल निकम यांना पराभवाचा धक्का बसला आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला आहे. उज्वल निकम यांनी जवळपास 55 हजारांची आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या तीन फेरीत उलटफेर करत वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली.

ujjwal nikam 1 jpg webp

उज्ज्वल निकाल प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली होती. तर दुसरीकडे त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड उभे होते.

---Advertisement---

भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी सुरुवातीला 53 हजारांचे लिड घेतले होते. त्यानंतर जोरदार मुसंडी मारत काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी निकमांवर सरशी केली. आता गायकवाड यांनी अटीतटीच्या लढतीत निकमांचा पराभव करत विजय खेचून आणला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---