⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | Exit Poll : राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका.. एकनाथ खडसे

Exit Poll : राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका.. एकनाथ खडसे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२४ । लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्यानंतर आता एक्झिट पोल्स समोर येत असून यामध्ये प्रामुख्याने एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून भाजपाच्या सर्व नेत्यांनी ४०० पारचा दिलेला नारा जरी प्रत्यक्षात उतरताना दिसत नसला तरी सत्तास्थापनेचं बहुमत भाजपाकडे असेल, असे कल एक्झिट पोलमधून समोर आले आहेत. पण दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपाप्रणीत महायुतीला मोठा फटका बसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यावरून राज्यात दावे-प्रतिदावे सुरू असून याच दरम्यान, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष निवडणुकांपूर्वी भाजपामध्ये प्रवेशाचा मानस उघडपणे बोलून दाखवणारे एकनाथ खडसे यांनी भाजपालाच कानपिचक्या दिल्या आहेत. भाजपाला राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसल्याचं विधान एकनाथ खडसेंनी केलं आहे.

मागील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी काही विकासकामं केली आहेत, ते पाहता जनतेने त्यांना पुन्हा एकदा पाठींबा दिल्याचं पाहायला मिळत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. चारशे पार होईल अशी आपल्याला अपेक्षा नव्हती. मात्र साडेतीनशे पार होईल हा विश्वास होता. पोलचां निकाल पाहता साडेतीनशे वर जागा मिळतील अशी चिन्हे आहेत असंही खडसे म्हणाले.

दरम्यान, भाजपाला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला आहे का? अशी विचारणा केली असता एकनाथ खडसेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “नक्कीच. महाराष्ट्रात जे फोडाफोडीचं राजकारण झालंय, त्याचा फटका भाजपाला बसताना दिसतोय. राज्यभरात फोडाफोडीचं राजकारण मतदारांनी अमान्य केलं आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतला. उद्धव ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंकडे गेला. मूळ पक्ष ज्यांचा आहे, ज्यांनी रात्रंदिवस परिश्रम करून हे पक्ष उभे केले, त्यांच्या हातून ते इतरांच्या हातात जाणं या फोडाफोडीच्या राजकारणाचा हा परिणाम आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले.

एक्झिट पोल मध्ये एक-दोन जागांचा फरक असतो. महाराष्ट्रात मागच्या तुलनेपेक्षा या वेळेस चार जागांचा फटका भाजपाला बसतोय असं एक्झिट पोल मध्ये दिसते. उद्धव ठाकरे यांचा दोन नंबर वर जागा दिसताय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विषयी असलेली सहानुभूती आणि मूड शिवसेना यांना मतदान करण्याची भूमिका मतदारांनी घेतली त्यामुळे असं दिसतंय. आतापर्यंत जेवढे ओपन पोल आले त्यात रक्षा खडसे या विजय आघाडीवर दिसत आहे. रक्षा खडसे ह्या एक लाखाच्यावर निवडून येतील असा मला आधीपासून विश्वास आहे, असेही खडसे म्हणाले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.