पदवीधरांना सुवर्णसंधी! LIC हाउसिंग फायनान्समध्ये मोठी पदभरती; 40 हजार मिळणार पगार

एप्रिल 17, 2026 1:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी सदंर्भ । तुम्हीही पदवीधर असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी चालून आली आहे. LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये भरती जाहीर केली आहे. ज्युनियर असिस्टंट पदासाठी ही भरती होणार असून बँकिंग आणि वित्त क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. LIC HFL Bharti 2026

LIC HFL

या भरती मोहिमेद्वारे एकूण १८० पदे भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार १६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ पर्यंत lichousing.com या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना देशभरातील विविध शाखांमध्ये नियुक्त केले जाणार आहे. LIC HFL Recruitment 2026

भरतीसाठी पात्रता काय?

या पदासाठी अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 55% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय, आजच्या डिजिटल युगाची गरज ओळखून उमेदवाराला कॉम्प्युटर सिस्टीममधील ऑपरेटिंग आणि दैनंदिन कामकाजाचे तांत्रिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. शैक्षणिक पात्रता आणि तांत्रिक कौशल्य यांचा योग्य मेळ असलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाणार आहे.

या भरतीसाठी किमान वय २१ वर्षे आहे, म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ एप्रिल २००५ पूर्वी झालेला असावा. कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे, म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ एप्रिल १९९६ पूर्वी झालेला नसावा. तसेच इच्छुक उमेदवारांना 944 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना 40 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. या भरतीमुळे वित्त क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाला मोठी चालना मिळणार असून, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे फायदेशीर ठरेल.

अर्ज कसा करावा

अधिकृत वेबसाइटवर तुमचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा.
अर्जामध्ये तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (छायाचित्र, सही, अंगठ्याचा ठसा, घोषणापत्र).
अर्ज शुल्क भरा.
अर्ज सादर करा आणि पुष्टीकरण डाउनलोड करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now