⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

केसीई व आयएमआर महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२२ । केसीई व आयएमआर महाविद्यालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी जयवर्धन नेवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एम बी ए कोऑरडिनेटर डॉ पराग नारखेडे यांनी त्याचे स्वागत केले. सुत्रसंचलन डॉ शमा सराफ यांनी केले. या प्रसंगी बोलताना जयवर्धन नेवे म्हणाले.


आज शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 348 वर्षे झालीत. ह्या जाणत्या राजाकडे उपजतच आर्ट ऑफ लिव्हिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, बाॅडी लॅन्ग्वेजचे ज्ञान होते. पहिली मोठी लढाई 1648 साली.. राजांचा नजरेत भरणारा मोठा पराक्रम जावळीचा… त्यावेळी राजे 26 वर्षाचे होते.. शिवरायांसारख्या अलौकिक राजांचा राज्याभिषेक 44 व्या वर्षी झाला. तोपर्यंत अफजलखान, शाहिस्तेखान मिर्झा राजा जयसिंग, आणि खुद्द आलमगीर औरंगजेब. यांच्यासारखे शत्रुंवर राजांनी मात केली. शिवाजी राजे कुशल सेनानी आणि युध्दतज्ञ होतेच.. पण त्याबरोबरच ते मुलकी कारभारात तज्ञ होते.

सर्व विस्ताराने सांगतांना जयवर्धन नेवे यांनी विविध लढाया त्याची निगडीत स्ट्रेटेजी विस्ताराने सांगितली. राजे इतक्या लढाया आयुष्यभर लढले पण त्यांनी प्रजेवर कधीही नवे कर लादले नाही. जनतेवर करांचा बोजा लादला नाही. नवी गावे वसवली. शेतसारा निश्चित केला. नवीन किल्ले बांधलेत. जुने किल्ले मजबूत केलेत.. किल्ल्यांची धान्यकोठारे भरुन ठेवली. हे सर्व सांगत असतांना श्री नेवे यांनी व्यवस्थापन आणि प्रशासन कारभारात किती तज्ञ ते होते हे दर्शवले. आभार प्रदर्शन डॉ शमा सराफ यांनी केले.