जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२५ । आज सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक घटना घडली आहे. ज्यात सरन्यायाधीश भूषण गवई (CJI)यांच्यावर कोर्टातच बूट फेकण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला. घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वकिलाला ताबडतोब ताब्यात घेतले.सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत वकिलाने हे कृत्य केले. राकेश किशोर असे सरन्यायाधीशांवर बुट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं कोर्टात?
आज सोमवारी सकाळी सुप्रीम कोर्टाचे कामकाज सुरू झाले होते. सुनावणीवेळी युक्तीवाद सुरू होता, त्यावेळी राकेश किशोर हा वकील पुढे गेला अन् पायातील बूट काढून गवईंकडे फेकण्याचा प्रयत्न केला. वेळीच सुरक्षा रक्षाकाने त्याला ताब्यात घेतलं. कार्टाच्या बाहेर काढलं. कोर्टाबाहेर जाताना तो सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणा देत होता.

हा सर्व प्रकार सुरू होता त्यावेळी CJI गवई शांत होते. ते म्हणाले की, अशा घटानामुळे आम्ही विचलीत होणार नाही. तुम्ही तुमचा युक्तीवाद सुरूच ठेवा. दरम्यान या घटनेने क्षणभरात खळबळ उडाली आहे. आरोपी राकेशचं वय हे ६० आहे. त्याने सुप्रीम कोर्टातील बार कौन्सिलमध्ये २०११ साली नोंदणी केली होती. या राकेश किशोरच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.











