⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

प्रा.आ.केंद्र हिंगोणा अंतर्गत डेंगु प्रतिबंधात्मक उपाय योजनांना सुरुवात

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जुलै २०२१ । दोन दिवसांपुर्वी हिंगोणा येथे डेंगु आजाराचा संशयित रुग्ण आढळल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे,प्रा.आ.केंद्र हिंगोणा चे वैद्यकीय अधिकारी डॉ.फीरोज तडवी,डॉ.अभिषेक ठाकुर व तालुका हिवताप पर्यव्यक्षक व्ही.डी.नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 16 जुलै 2021 रोजी हिंगोणा गावातील नागरीकांचे डेंगु सदृश्य लक्षणांच सर्वेक्षण, गावातील कन्टेनर तपासणी करुन गावात साचलेल्या पाण्यांच्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडुन डेंगु आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांना सुरुवात करण्यात आली. 

गावातील प्रत्येक घरांमध्ये व घरांसमोर असलेल्या पाण्याच्या टाक्या, माठ, रांजण, जुने टायर, नारळाच्या करवंट्या, भांडे व इतर कन्टेनर मध्ये असलेल्या पाण्याची पहाणी करुन ज्या कन्टेनर मध्ये डासांच्या अळ्या आढळुन आल्या ते कंटेनर तात्काळ रीकामे करुन नागरीकांना डेंगु आजाराविषयी प्रबोधन करण्यात आले.

यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी, डॉ.अभिषेक ठाकुर, तालुका हिवताप पर्यव्यक्षक विजु नेमाडे, आरोग्य पर्यव्यक्षक घन:श्याम डोळे, आरोग्य सेवक त्र्यंबक सावळे, विलास महाजन, कनिष्ठ साहाय्यक पंकज चोपडे, आरोग्य कर्मचारी व सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या.