⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

स्व. माजी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेस मान्यता द्यावी – खा. उन्मेश पाटील

जळगाव लाईव्ह न्युज | १२ मे २०२२ | राज्यभरातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी योजना असलेले भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मागील वर्षापासून राज्यभरात लागू “न” करता मान्यता देण्यात आलेली नाही. याबाबत शेतकऱ्याशी वेळोवेळी चर्चा करीत असताना  अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांकरिता (२.०० हे. व त्यापेक्षा कमी क्षेत्र) असलेल्या लाभार्थ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना योजने अंतर्गत फळबाग लागवड करिता अनुदान उपलब्ध आहे. परंतु महाभूधारक शेतकरी (२.०० हे. पेक्षा जास्त) क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांकरीता मागील वर्षापासून फळबाग लागवड करण्यात आलेला कुठलीही योजना सुरू नसल्याचे कळते. ही बाब गंभीर असून तातडीने

स्व. माजी कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेस मान्यता द्यावी अशी आग्रही मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी राज्य शासनाकडे केली आहे

                आपल्या निवेदनात खासदार उन्मेश पाटील यांनी  शेतकऱ्यांच्या दृष्टीने व शाश्वत उत्पन्न करिता आवश्यक असलेले फळबाग लागवडीचे क्षेत्र राज्यभरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच महाभुधारक शेतकऱ्यांना फळबाग लागवडी करिता अनुदानाचा लाभ मिळून लागवड करण्यास प्रोत्साहन होणे करीता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेस मान्यता देऊन राज्यभरात राबविण्याबाबत आपण आदेशित करावे. अशी मागणी केली आहे. या आशयाचे निवेदन

राज्याचे कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांना दिले आहे. तसेच मा.प्रधान सचिव (कृषि) महाराष्ट्र राज्य, मुंबई,मा.आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय, पुणे,मा.जिल्हाधिकारी, जळगाव,मा.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांना माहिती व पुढील कार्यवाहीस्तव देण्यात आल्या आहे.