⁠ 
सोमवार, डिसेंबर 2, 2024
Home | राष्ट्रीय | Technology News : तंत्रज्ञान विश्वात झाला जगातील सर्वात मोठा करार, रक्कम ऐकून येतील चक्कर

Technology News : तंत्रज्ञान विश्वात झाला जगातील सर्वात मोठा करार, रक्कम ऐकून येतील चक्कर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२ । जगभरात दररोज कुठे ना कुठे कोणते तरी करार होत असतात. काही करारांची मोठी चर्चा होत असते. तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठा करार नुकताच झाला आहे. जगप्रसिद्ध उद्योगपतीला बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने कँडीक्रश व्हिडिओ गेम निर्माता ऍक्टीव्हिजन ब्लिझार्डला ६८.७ अब्ज डॉलर म्हणजेच ५.१४ लाख कोटी रुपयात खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. मायक्रोसॉफ्टच्या ४६ वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात मोठा करार आहे.

जगभरात गेल्या काही दिवसापासून ट्विटरच्या खरेदीची मोठी चर्चा सुरु होती. अखेर सोमवारी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतले आहे. ट्विटर खरेदीचा करार ४४ अब्ज डॉलर म्हणजेच ३.३७ लाख कोटी रुपयांमध्ये झाला आहे. मस्क-ट्विटर करार हा टेक जगतातील आतापर्यंतचा तिसरा सर्वात मोठा करार आहे. तत्पूर्वी, मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कँडी क्रश गेम निर्माता ऍक्‍टिव्हिजन ब्लिझार्डसोबत गेमिंग क्षेत्रातील सर्वात मोठा करार केला होता. मायक्रोसॉफ्टचा करार तंत्रज्ञान जगातील सर्वात मोठा करार समजला जातो.

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी प्रथम मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरमध्ये ९.२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. ट्विटर खरेदी करण्यासाठी त्यांनी काही दिवसांनंतर ट्विटर बोर्डाला पत्र लिहून कंपनीला १०० टक्के खरेदी करण्याची मोठी ऑफर देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. इलॉन मस्क यांनी ट्विटर तब्बल ४३ अब्ज डॉलर म्हणजेच ३.२ लाख कोटी रुपयात विकत घेण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर सोमवारी उशिरा 44 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय रुपयात ३.३७ लाख कोटी रुपयात करार पूर्ण झाला. मस्कच्या ऑफरनुसार, त्याला ट्विटरच्या प्रत्येक शेअरसाठी ५४.२० डॉलर म्हणजे ४१४८ रुपये मोजावे लागणार आहे.

इलॉन मस्क आणि ट्विटरचा करार जगातील तिसरा सर्वात मोठा करार असला तरी बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्टने कँडीक्रश व्हिडिओ गेम निर्माता ऍक्टीव्हिजन ब्लिझार्डला ६८.७ अब्ज डॉलर म्हणजे ५.१४ लाख कोटी रुपयात खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. करारामुळे मायक्रोसॉफ्टला ऍक्टीव्हिजनचे सुमारे ४०० दशलक्ष मासिक गेमिंग वापरकर्ते मिळणार आहेत. या करारामुळे मायक्रोसॉफ्ट अ‍ॅक्टिव्हिजनला प्रति शेअर ९५ डॉलर म्हणजेच ७ हजार २८० रुपये द्यावे लागणार आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.