⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | बातम्या | लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात

लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होण्यास सुरुवात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२४ । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आतापर्यंत महिलांच्या जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे हप्ते जमा झाले आहे. त्यानंतर आता चौथा हप्तादेखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौथा आणि पाचवा हप्ता अॅडव्हान्समध्ये देण्यात आला असून महिलांच्या बँक खात्यात ३००० जमा होत आहे.

लाडकी बहीण योजनेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे म्हणजेच ३००० रुपये महिलांच्या अकाउंटला पाठवण्यास सुरुवात झाली आहे.१० ऑक्टोबरपूर्वी महिलांना हे पैसे देण्यात येत आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा हप्ता आल्यानंतर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसेदेखील येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना दिवाळीपू्र्वीच भाऊबीजेची ओवाळणी मिळाली असल्याचे बोलले जात आहे.

लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही
जर तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असेल तरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर लगेच बँकेत जाऊन करुन घ्या. त्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येतील. तुम्ही तुमच्या ऑनलाइन बँकिंग अॅपवर पैसे आलेत की ते चेक करु शकतात. तसेच तुम्ही बँकेत किंवा पोस्टात जाऊन पैसे आलेत की याबाबत माहिती मिळवू शकतात. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.