जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२५ । लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्वाची बातमी समोर आलीय. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे

खरंतर डिसेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे दिले गेले होते आणि या महिन्यातदेखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होणार आहेत. २६ जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे सांगितले आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत जानेवारीचा हप्ता यायला अजून दोन दिवस आहेत त्याआधीच काही महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना पैसे येतील, असं सांगितलं जात आहे.
पैसे आले की नाही कसं चेक कराल?
लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यावर लाभार्थी महिलांना मेसेज येतो. जर मेसेज आला नाही तर, तुम्ही बँकेच्या अॅपवर जाऊन पैसे आले की नाही ते चेक करू शकतात. बँकेच्या अॅपवर जाऊन अकाउंट डिटेल्समध्ये जा आणि तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे आहेत ते समजून घ्या. तसेच, तुम्ही बँकेत जाऊनदेखील पैसे आलेत की नाही ते चेक करू शकतात.
लाडकी बहीण योजनेच्या वाढीव निधीबाबत संभ्रम
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये दिले जाण्याचे आश्वासन दिले होते, जे मार्च महिन्यानंतर मिळणार असे सांगितले होते. मात्र, आता हे पैसे मार्च महिन्यानंतरदेखील मिळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. बालविकास विभागाने अर्थमंत्रालयाकडे अजून वाढीव निधीबाबत शिफारस केली नसल्याची माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिली आहे.