जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने रेशन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी रेशन कार्डधारकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ई-केवायसीद्वारे, रेशन वितरणात पारदर्शकता तर येईलच, शिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा गैरवापरही थांबवता येईल.

केंद्र सरकारने नागरिकांना रेशन कार्ड केवायसी (KYC) करण्यासाठी अंतिम मुदत आधीच दिली होती. मात्र, ही मुदत वाढवून ३१ मार्च करण्यात आली आहे. तर जर तुम्ही अजूनही ई-केवायसी केले नसेल तर तुम्ही केवायसी करावे. जर तुम्हीचं रेशन कार्ड केवायसी नसेल झालं तर तुम्हाला आजच हे काम करावं लागेल. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होईल.
केंद्र सरकारकडून गरीब कुटुंबातील नागरिकांना रेशन कार्ड दिले जाते. रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते. यामुळे त्यांचा खर्च कमी होतो. तुमच्या जवळच्या रेशन दुकानावर जाऊन तुम्ही धान्य घेऊ शकतात. यामध्ये गहू, तांदूळ, तेल अशा अनेक गोष्टींचा समावेश आहेत. या गोष्टी तुम्हाला कमी किंमतीत किंवा मोफत मिळतात.
केवायसी करण्याची प्रोसेस
मात्र केंद्राने रेशन कार्ड केवायसी अनिवार्य केले आहे. रेशन कार्डधारक फक्त आजपर्यंतच ई केवायसी करु शकतात. त्यासाठी तुम्हाला जवळच्या रेशन कार्ड दुकानात जावे लागेल. रेशन कार्ड दुकानात जाऊन तुम्ही बायोमॅट्रिक करु शकतात. बायोमॅट्रिक करुन तुम्ही केवायसी पूर्ण करु शकतात. यासाठी तुम्हाला रेशन कार्ड सोबत घेऊन जायचे आहे.
रेशन कार्ड हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नारंगी, पांढरे असे रेशन कार्ड असतात. हे रेशन कार्ड नागरिकांच्या उत्पन्नानुसार त्यांना दिले जातात. त्यानुसारच त्यांना मोफत अन्नधान्य दिले जाते. त्यांचे उत्पन्न जर जास्त असेल तर त्यांना मोफत रेशन कार्ड मिळत नाही.