10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची उत्तम संधी! ५६,९०० रुपये पगार मिळणार, लगेचच अर्ज करा

मे 2, 2025 12:21 PM

तुम्हीही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर नगरपरिषदेत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य सरकारअंतर्गत भरती जाहीर केली आहे. फायरमन पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

job jpg webp

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ मे २०२५ आहे. इच्छुकांनी आपला अर्ज मलकापूर नगरपरिषद, मलकापूर, जिल्हा कोल्हापूर येथे पाठवायचा आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

पात्रता काय?
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असावी. याचचसोबत शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई येथून कोर्स पूर्ण केलेला असावा.या नोकरीसाठी तुमच्याकडे एम-एस सीआयटी कोर्स केलेला असावा.

किती पगार मिळेल?
फायरमन पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८००० ते ५६,९०० रुपये पगार मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment